व्यवसाय कमी होण्याच्या भीतीने ‘ट्रॅव्हल्स’ची भाडेवाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:55+5:302021-08-20T04:27:55+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये खासगी, आरामबसेसची चाके थांबली नाहीत. प्रवासी संख्या कमी असली, तरी ही वाहतूक व्यवस्था सुरू राहिली. डिझेलची ...

There is no increase in the fare of ‘Travels’ for fear of losing business | व्यवसाय कमी होण्याच्या भीतीने ‘ट्रॅव्हल्स’ची भाडेवाढ नाही

व्यवसाय कमी होण्याच्या भीतीने ‘ट्रॅव्हल्स’ची भाडेवाढ नाही

googlenewsNext

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये खासगी, आरामबसेसची चाके थांबली नाहीत. प्रवासी संख्या कमी असली, तरी ही वाहतूक व्यवस्था सुरू राहिली. डिझेलची दरवाढ झाल्याने विविध क्षेत्रातील महागाई वाढली. एसटी बसेसचे तिकिटांचे दर वाढले. त्यामुळे खासगी, आरामबसेसच्या तिकिटांमध्येही वाढ होईल असे वाटत होते. मात्र, तसे झालेले नाही. कोल्हापूरमधून सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, सोलापूर, लातूर, नांदेड, बंगलोर, हैदराबाद, गोवा, अहमदाबाद, आदी शहरांमध्ये सेवा देण्यासाठी चारशे बसेस धावत आहेत.

मार्गनिहाय तिकीट दर

कोल्हापूर-मुंबई : ५०० ते १००० रुपये

कोल्हापूर-पुणे : २५० ते ४००

कोल्हापूर-औरंगाबाद : ६०० ते ८००

कोल्हापूर-नागपूर : १२०० ते १४००

कोल्हापूर-नाशिक : ६०० ते ९००

कोल्हापूर-सोलापूर : २०० ते ३००

कोल्हापूर-लातूर, नांदेड : ६०० ते ९००

कोल्हापूर-गोवा : ३०० ते ८००

कोल्हापूर-बंगलोर : ६०० ते ९००

कोल्हापूर- हैदराबाद : ७०० ते १५००

कोल्हापूर-अहमदाबाद : १००० ते १३००

प्रतिक्रिया

कोरोनाच्या नियमांचे पालन करत खासगी, आरामबसेसची सेवा सुरू आहे. ४० टक्के प्रवासी संख्या अद्याप कमी असून, त्यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. कोरोनामुळे व्यवसाय आधीच कमी झाला आहे. तो आणखी कमी होऊ नये आणि व्यवसायातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तिकिटांचे दर आम्ही वाढविलेले नाहीत.

- सतीशचंद्र कांबळे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा आरामबस वाहतूक संघटना.

चौकट

सरकारने मदतीचा हात द्यावा

जिल्ह्यातील खासगी, आरामबसेसची संख्या ५५० इतकी आहे. त्यातील चारशे बसेस सध्या विविध मार्गांवर सेवा देत आहेत. प्रवासी संख्या कमी असल्याने या आरामबसेसचा कसाबसा व्यवसाय सुरू आहे. रिक्षाचालकांप्रमाणे आम्हा खासगी बसधारक, चालक, वाहकांना राज्य सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी सतीशचंद्र कांबळे यांनी केली.

190821\19kol_3_19082021_5.jpg

डमी (१९०८२०२१-कोल-१०७१ डमी)

Web Title: There is no increase in the fare of ‘Travels’ for fear of losing business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.