Lokmat Money > बिझनेस न्यूज > तिसऱ्या दिवशीही सेन्सेक्सची आपटी

तिसऱ्या दिवशीही सेन्सेक्सची आपटी

विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल काढून घेण्याचे सत्र आणि जागतिक बाजारातील मंदी यामुळे सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्सची १७४ अंकांनी घसरण होऊन

By admin | Published: January 6, 2016 11:34 PM2016-01-06T23:34:23+5:302016-01-06T23:34:38+5:30

विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल काढून घेण्याचे सत्र आणि जागतिक बाजारातील मंदी यामुळे सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्सची १७४ अंकांनी घसरण होऊन

On the third day, | तिसऱ्या दिवशीही सेन्सेक्सची आपटी

तिसऱ्या दिवशीही सेन्सेक्सची आपटी

मुंबई : विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल काढून घेण्याचे सत्र आणि जागतिक बाजारातील मंदी यामुळे सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्सची १७४ अंकांनी घसरण होऊन २५,४०६.३३ या तीन आठवड्यांतील नीचांकी स्तरावर आला.
सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीही दबावाखाली येऊन ०.५६ टक्क्यांनी म्हणजे ४३.६५ अंकांनी घसरून ७,७४१.०० वर बंद झाला.
सेन्सेक्सची २५,६२८.२३ अंकाने सुरुवात झाली. एकवेळ तो २५,६३२.५७ या सर्वोच्च स्तरावर पोहोचला. विशेषत: रिलायन्स आणि अन्य काही ब्लू चीप शेअर्सला मिळालेल्या प्रतिसादाने बाजार वधारला होता; पण त्यानंतर सेन्सेक्समध्ये घसरण होऊन तो एकवेळ २५,३५७.७० वर गेला.
शेवटी १७४.०१ अंकांनी घसरण होऊन २५,४०६.३३ वर बाजार बंद झाला. यापूर्वी १५ डिसेंबर रोजी २५,३२०.४४ अंकावर बाजार बंद झाला होता. त्यानंतरचा हा नीचांकी स्तर आहे.
बीएसईतील एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्स १.५७ टक्के, धातू १.४८ टक्के, भांडवली सामान १.३२ टक्के, आॅटो १.२४ टक्के, रियल्टी ०.८५ आणि बँकिंग ०.८१ टक्क्यांनी
घसरले.
आशियात चीन वगळता अन्य बाजारात घसरण झाली. दोन दिवसांच्या घसरणीनंतर चीनचा बाजार सावरला. युरोपातही प्रारंभी घसरण झाली.

Web Title: On the third day,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.