कोल्हापूर : २०१४ मध्ये ज्यांना भाजपमध्ये जायचं होतं ते गेले आहेत. आता कोणाला जायची इच्छा नाही. कोल्हापुरातील जे भाजप मध्ये गेले आहेत, ते नेते आता जुन्या भाजप नेत्यांच्या डोक्यावर येऊन बसले आहेत. अजून आणखी बसवणार आहेत का माहित नाही. अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी महाडीक यांचेवर नाव न घेता निशाणा साधला. ते आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमाशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यावर भाष्य केले. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस आयुक्तालय कोल्हापुरात व्हावे अशी आमची मागणी आहे. मात्र कोल्हापुरातील हे आयजी ऑफिस पुण्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आमचं सरकार असताना आम्ही हे होऊ दिल नाही. आता जागा चाचणीसाठीचे पत्र विभागीय आयुक्तांना गेल्याचे समजते. सरकारने मध्यस्थी करून हे थांबवले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. गेल्या काही वर्षात केंद्रातल्या सरकारचं दबावाचं आणि विरोधकांना जाणीव पूर्वक टारगेट करून होत असलेल राजकारण याला विरोध झाला पाहिजे. अशी भूमिकाही त्यांनी मांडली. महागाईवर न बोलता देशातील राजकारण वेगळ्या पद्धतीने घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. ही लोकशाही आहे आणि लोकांना न्याय देणं गरजेचं आहे. त्यामुळच सर्व विरोधी पक्ष समर्पक अशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि याचा आनंद आम्हाला देखील असून आमची ही आघाडी भक्कम होईल याचा विश्वास असल्याचेही ते म्हणाले.हा प्रशासकीय विषय आमदार हसन मुश्रीफ यांच्या शासन आपल्या दारी जाहिरातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो असल्याने यावर जिल्ह्यातील राजकारणात अनेक तर्क वितर्क केले जात आहेत. मात्र आमदार पाटील यांनी, हा प्रशासकीय विषय आहे. त्याला राजकीय घेण्यात काही अर्थ नसल्याच सांगितले. जो काही निर्णय असेल तो वेळ आल्यावर येईलकाँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत जो काही निर्णय असेल तो वेळ आल्यावर येईल. असही त्यांनी सांगितले. पाटणा येथे सर्व पक्षांची झालेल्या बैठकीवर बोलताना ते म्हणाले, पहिल्यांदा सर्व विरोधी पक्ष एकत्र आले हे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी त्यांच्या दौऱ्यात कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असा उल्लेख केल्याने याचा अभिमान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जे भाजपमध्ये गेलेत, ते जुन्या नेत्यांच्या डोक्यावर बसलेत; आमदार सतेज पाटलांचा टोला
By विश्वास पाटील | Published: June 24, 2023 7:44 PM