कोल्हापूरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत बस घुसून 2 ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 09:00 PM2017-10-01T21:00:33+5:302017-10-02T12:28:33+5:30
गंगवेश परिसरात विसर्जन मिरवणुक सुरु असताना ब्रेक फेल झाल्याने के एम टी बस घुसली. यात 2 जणांचा बळी गेला आहे. रविवारी रात्री ८ च्या सुमारास गर्दीने गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने केएमटी बसवर हल्ला चढवला. या घटनेने परिसरात तणाव आहे.
कोल्हापूर, दि. १ : ताबूत विसर्जन मिरवणुकीत रहदारीच्या गंगवेश परिसरात ब्रेक फेल झाल्याने के एम टी बस घुसली. या अपघातात 2 जणांचा बळी गेला आहे. परिसरात मोठा तणाव असून संतप्त जमावाने बस पेटविल्याचे समजते.
रविवारी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात शहरातील गर्दीने गजबजलेल्या गंगावेश परिसरात झाला. घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने केएमटी बस वर (एम एच ०९ बी सी २१६६) हल्ला चढवला. या घटनेने परिसरात तणाव आहे.
ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बस खाली सापडून 2 जण ठार झाल्याचे आनंदा राऊत यांच्यासह ६ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. हे सर्वजण राजारामपुरी येथील मातंग वसाहतीमधील असल्याचे समजते.
तानाजी साठे व सुजल अवघडे असे ठार झालेल्या दोन व्यक्तीचे नाव समजले असून संतप्त जमाव शासकीय रूग्णालयाकडे चालला आहे. बसचालकाला शिक्षा करा, अशा घोषणा ते देत आहेत. त्यांनी सीपीआर चौकातील काही बसगाड्या फोडल्या. ठार झालेले तानाजी साठे हे पंजाचे मालक आहेत.
रविवारी शहरात ताबूत विसराजां मिरवणूक होती या मिरवणुकीतील काही पंजे वाद्यांच्या गजरात पंचगंगा नदीकडे निघाले होते. त्याचवेळी शिवाजी चौकाकडून गंगावेश कडे निघालेल्या केएमटी बसचा ब्रेक निकामी होऊन मिरवणुकीत घूसली. ३ हजारहून अधिक लोकांचा जमाव घटनास्थळी आहे.
या वेळी येथे आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीची काच देखील या वेळी फोडण्यात अली. परिस्थिती तणावपूर्ण बनलेने जलद कृती दलाचे दोन तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत