कोल्हापूर : म्युकरमायकोसिसचे आणखी तीन संशयित वाढले असून, सीपीआरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या १३ झाली आहे. दरम्यान, सीपीआरमध्ये आणखी १९ रुग्णांसाठी मानसोपाचार विभागात स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे, तर शुक्रवारी दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.म्युकरचे सुरुवातीच्या दोन दिवसात दहा रुग्ण सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची बायएफसी करण्यात आली आहे. मात्र त्याचे अहवाल अजून आलेले नाहीत. गेल्या दोन दिवसात तीन संशयित रुग्ण वाढले आहेत. यातील दोन कोरोनाग्रस्त आहेत. दोन दिवसांपूर्वी एका, तर शुक्रवारी दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.पहिला १० बेडचा विभाग भरल्याने गुरुवारी मानसोपचार विभागामध्ये आणखी एक विभाग सुरू करण्याची तयारी सुरू होती. या ठिकाणचे सॅनिटायझेशनही करून घेण्यात आले असून, येथे रुग्णही दाखल करून घेण्यात आले आहेत.
Muucormycosis In Kolhapur-म्युकरमायकोसिसचे आणखी तीन संशयित वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 12:35 PM
Muucormycosis CoronaVirus Kolahpur : म्युकरमायकोसिसचे आणखी तीन संशयित वाढले असून, सीपीआरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या १३ झाली आहे. दरम्यान, सीपीआरमध्ये आणखी १९ रुग्णांसाठी मानसोपाचार विभागात स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे, तर शुक्रवारी दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
ठळक मुद्देम्युकरमायकोसिसचे आणखी तीन संशयित वाढले १९ बेडचा नवीन विभाग सुरू : दोघांवर शस्त्रक्रिया