शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांचे तीन टप्पे
By admin | Published: March 31, 2015 10:43 PM2015-03-31T22:43:10+5:302015-04-01T00:03:02+5:30
मेमध्ये परीक्षा : आॅफलाईन, आॅनलाईन स्वरूप
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा यावर्षी तीन टप्प्यांमध्ये होणार आहेत. त्यात आॅनलाईन व आॅफलाईन स्वरूपातील परीक्षा १० मे रोजी, तर आॅफलाईन माध्यमातील परीक्षा १७ मे आणि २४ मे रोजी होणार आहेत.त्यात १० मे रोजी एम. एस्सी. झूलॉजी, एम.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, एम.एस्सी. एन्व्हॉरमेंटल सायन्स, एम.एस्सी. अॅग्रो केमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट, एम.एस्सी. फूड सायन्स् अँड टेक्नॉलॉजी या विषयांच्या परीक्षा आॅनलाईन होतील. बी.जे.सी., एम.जे.सी., एम. ए. इंटरन्स् फॉर आॅदर फॅकल्टी, डिस्टन्स् मोड : एमबीए अँड एमबीए (एक्झिक्युटिव्ह), एम. ए. मास कम्युनिकेशन या विषयांच्या परीक्षा आॅफलाईन होतील. दि. १७ मे रोजी एमएसडब्ल्यू, एमआरएस, एमसीए, एमबीए, एम.टेक्., या विषयांच्या परीक्षा आॅफलाईन होतील. दि. २४ मे रोजी एमसीए (सायन्स) , एमसीए (कॉमर्स), एम. एस्सी. (केमिस्ट्री), एम.एस्सी. (बॉटनी), एम.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स), एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, एम.ए., एम.एस्सी. भूगोल, एम.एस्सी. मॅथेमॅटिक्स, एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी, एम.एस्सी. फिजीक्स, एम.एस्सी. जीओलॉजी. एम.लिब. अँड इन्फॉर्मेशन सायन्स, एम.एस्सी. स्टॅटेस्टिक, अॅप्लाईड स्टॅटेस्टिक अँड इन्फॉर्मेटिक्स्. या परीक्षांसाठी (ङ्मल्ल’्रल्ली. २ँ्र५ं्न्र४ल्ल्र५ी१२्र३८.्रल्ल) या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. त्याची प्रक्रिया आज, बुधवारपासून सुरू होणार आहे. या परीक्षांची गुणवत्ता यादीची प्रसिद्धी १५ मे रोजी होईल. तक्रारी २० मेपर्यंत घेण्यात येतील. त्यानंतर २४ जूनला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. (प्रतिनिधी)
परीक्षा केंद्रे अशी...
आॅफलाईन परीक्षा केंद्रे : शिवाजी विद्यापीठ,सायबर (कोल्हापूर).
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ
सायन्स (सातारा), सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज (कराड). कस्तुरीबाई वालचंद कॉलेज आॅफ आर्टस् अॅण्ड सायन्स (सांगली). आॅनलाईन परीक्षा केंद्रे : डी. वाय. पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा, डिपार्टमेंट आॅफ कॉम्प्युटर सायन्स् शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), केबीपी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड पॉलिटेक्निक कॅम्प, यशोदा टेक्निकल कॅम्पस् (सातारा), राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर, साखराळे, कॉलेज आॅफ इंजिनिअरिग अॅण्ड टेक्नॉलॉजी, वानलेसवाडी, मिरज (सांगली).