शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
2
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
3
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
4
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
5
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
6
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
7
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
8
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
9
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
10
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
11
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
12
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
13
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
14
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
15
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
16
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
17
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
18
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
19
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
20
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला

शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांचे तीन टप्पे

By admin | Published: March 31, 2015 10:43 PM

मेमध्ये परीक्षा : आॅफलाईन, आॅनलाईन स्वरूप

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा यावर्षी तीन टप्प्यांमध्ये होणार आहेत. त्यात आॅनलाईन व आॅफलाईन स्वरूपातील परीक्षा १० मे रोजी, तर आॅफलाईन माध्यमातील परीक्षा १७ मे आणि २४ मे रोजी होणार आहेत.त्यात १० मे रोजी एम. एस्सी. झूलॉजी, एम.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, एम.एस्सी. एन्व्हॉरमेंटल सायन्स, एम.एस्सी. अ‍ॅग्रो केमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंट, एम.एस्सी. फूड सायन्स् अँड टेक्नॉलॉजी या विषयांच्या परीक्षा आॅनलाईन होतील. बी.जे.सी., एम.जे.सी., एम. ए. इंटरन्स् फॉर आॅदर फॅकल्टी, डिस्टन्स् मोड : एमबीए अँड एमबीए (एक्झिक्युटिव्ह), एम. ए. मास कम्युनिकेशन या विषयांच्या परीक्षा आॅफलाईन होतील. दि. १७ मे रोजी एमएसडब्ल्यू, एमआरएस, एमसीए, एमबीए, एम.टेक्., या विषयांच्या परीक्षा आॅफलाईन होतील. दि. २४ मे रोजी एमसीए (सायन्स) , एमसीए (कॉमर्स), एम. एस्सी. (केमिस्ट्री), एम.एस्सी. (बॉटनी), एम.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स), एम.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, एम.ए., एम.एस्सी. भूगोल, एम.एस्सी. मॅथेमॅटिक्स, एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी, एम.एस्सी. फिजीक्स, एम.एस्सी. जीओलॉजी. एम.लिब. अँड इन्फॉर्मेशन सायन्स, एम.एस्सी. स्टॅटेस्टिक, अ‍ॅप्लाईड स्टॅटेस्टिक अँड इन्फॉर्मेटिक्स्. या परीक्षांसाठी (ङ्मल्ल’्रल्ली. २ँ्र५ं्न्र४ल्ल्र५ी१२्र३८.्रल्ल) या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. त्याची प्रक्रिया आज, बुधवारपासून सुरू होणार आहे. या परीक्षांची गुणवत्ता यादीची प्रसिद्धी १५ मे रोजी होईल. तक्रारी २० मेपर्यंत घेण्यात येतील. त्यानंतर २४ जूनला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. (प्रतिनिधी)परीक्षा केंद्रे अशी...आॅफलाईन परीक्षा केंद्रे : शिवाजी विद्यापीठ,सायबर (कोल्हापूर). यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स (सातारा), सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज (कराड). कस्तुरीबाई वालचंद कॉलेज आॅफ आर्टस् अ‍ॅण्ड सायन्स (सांगली). आॅनलाईन परीक्षा केंद्रे : डी. वाय. पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा, डिपार्टमेंट आॅफ कॉम्प्युटर सायन्स् शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), केबीपी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड पॉलिटेक्निक कॅम्प, यशोदा टेक्निकल कॅम्पस् (सातारा), राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर, साखराळे, कॉलेज आॅफ इंजिनिअरिग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, वानलेसवाडी, मिरज (सांगली).