गोकुळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 07:31 PM2021-03-30T19:31:47+5:302021-03-30T19:33:48+5:30
Gokul Milk Election kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी करवीर प्रांताधिकारी कार्यालयात तोबा गर्दी झाली होती. सकाळी दहापासूनच कार्यालय गर्दीने ओसंडून वाहत होते. इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने शासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला होता.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी करवीर प्रांताधिकारी कार्यालयात तोबा गर्दी झाली होती. सकाळी दहापासूनच कार्यालय गर्दीने ओसंडून वाहत होते. इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने शासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला होता.
गोकुळसाठी गुरुवार (दि. २५) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र, शनिवार ते सोमवार सलग तीन दिवस सुटी असल्याने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. सकाळी दहापासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील निवडणूक कार्यालयात गर्दी झाली होती. दुपारी बारा वाजता तर प्रांताधिकारी कार्यालय गर्दीने ओसंडून वाहत होते.
इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने गर्दीत अधिक भर पडली. प्रांताधिकारी कार्यालयाच्या बाहेरचा परिसर चारचाकी गाड्या आणि कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता. एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने निर्बंध कडक केले असताना येथे मात्र अक्षरश: फज्जा उडाल्याचे दिसले.