सूर्यकिरणांचा ‘कटांजल’ स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:39 AM2017-11-13T00:39:40+5:302017-11-13T00:40:22+5:30

Touch the sunlight 'catcalls' touch | सूर्यकिरणांचा ‘कटांजल’ स्पर्श

सूर्यकिरणांचा ‘कटांजल’ स्पर्श

Next


कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई किरणोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत ठरलेल्या दिवसांनंतरही किरणोत्सव झाल्याने यंदा किरणोत्सवाच्या आदल्या दिवशी बुधवारपासूनच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व अभ्यासकांनी सूर्यकिरणांची पाहणी केली. किरणोत्सवानंतर रविवारी पाचव्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ४४ ते ४६ मिनिटे या दोन मिनिटांच्या कालावधीत सूर्यकिरणांनी अंबाबाई मूर्तीच्या पायाखाली असलेल्या कटांजलाला स्पर्श करून उजव्या बाजूंनी ती लुप्त झाली.
श्री अंबाबाईचा दि. ९ ते ११ नोव्हेंबर व दि. ३१ जानेवारी १ व २ फेब्रुवारी असा वर्षातून दोनदा किरणोत्सव होतो. पहिल्या दिवशी मावळतीची किरणे अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श, दुसºया दिवशी कमरेपर्यंत व तिसºया दिवशी मूर्तीच्या चेहºयावर येऊन किरणोत्सव पूर्ण होतो. मात्र, पूर्वीच्या काळी किरणोत्सव पाच दिवसांचाच असायचा नंतर तो तीन दिवसांवर आला. पुन्हा किरणोत्सव पाच दिवसांचा जाहीर केला जावा, अशी मागणी अभ्यासकांतून होत होती. त्यानुसार देवस्थान समिती व अभ्यासकांनी यंदा पाच दिवस किरणांची पाहणी सुरू केली तसेच सूर्यकिरणांच्या मार्गांचा आणि त्यात येणाºया अडथळ्यांचा अभ्यासही केला.
रविवारी किरणोत्सवांच्या पाचव्या दिवशी तो अभ्यासण्यात आला. त्यामध्ये सायंकाळी सूर्यकिरणे अंबाबाईच्या पायाखालील कटांजलला स्पर्श करून ती उजव्या बाजंूनी लुप्त झाली. ताराबाई रोडवरील दोन इमारती अजूनही सूर्यकिरणांच्या मार्गावरील अडथळा ठरत असल्याचे अभ्यासकांना दिसून आले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव विजय पोवार, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, शाहीर राजू राऊत, विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह अभ्यासक उपस्थित होते.

Web Title: Touch the sunlight 'catcalls' touch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर