भुदरगडमधील डोंगर आणि काथळावर उमलणा रानफुलांची पर्यटकांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:31 AM2021-09-07T04:31:07+5:302021-09-07T04:31:07+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्याला जागतिक वारसास्थळ असलेला पश्चिम घाटाचा काही भाग लाभला आहे. पश्चिम ...

Tourists are fascinated by the flowers blooming on the hills and hillsides of Bhudargad | भुदरगडमधील डोंगर आणि काथळावर उमलणा रानफुलांची पर्यटकांना भुरळ

भुदरगडमधील डोंगर आणि काथळावर उमलणा रानफुलांची पर्यटकांना भुरळ

Next

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्याला जागतिक वारसास्थळ असलेला पश्चिम घाटाचा काही भाग लाभला आहे.

पश्चिम भुदरगडमधील अनेक कातळ सडे व डोंगर भागातील वनांमध्ये पावसाळ्यानंतर उगवणारी अनेक रानफुले उमलली आहेत. कातळ सड्यावर फक्त पावसाळ्यात येणारी निळी पापणीसारख्या कीटकभक्षी वनस्पतीने जणू निळी जांभळी फुलांची शाल पांघरली आहे. तसेच चिरेपापणीची कीटकभक्षी वनस्पती मधील फुले घेऊन खडकवर उगविली आहेत. बेगोनिया प्रकारातील सुंदर फुलेही आपले सुंदर रूप खुलवत आहे. पिवळ्या रंगाची सोनकी व कवळ्याची फुले, गुलाबी रंगाची चांदणी फुले, जांभळी चिरायत, गेंद, केना, नभाळी, बेचका अशी फुले कातळ साड्यांची शोभा वाढवत आहेत. डोंगरावरच्या वनांमध्ये ओर्किड वर्गीय गुलाबदानी, वाघचोरा वनस्पतीची फुले तसेच कळलावीची ( अग्निशिखा ) फुले, उडी चिरायात, नीलकंठ ची सुंदर रंगसंगतीची फुले लक्ष वेधून घेत आहेत.

सह्याद्रीच्या पश्चिम घाट माथ्यावर लाखोंच्या संख्येने उमलणारी ही अनेक रंगीत फुले जैवविविधतेचा मोलाचा खजिना आहेत. परंगीभवनाच्या माध्यमातून जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी मधाचे आमिष अनेक किडे, माशा, पतंग, फुलपाखरे यांना घालत आहेत. पश्चिम भुदरगडमधील विविध रंगांची शाल पांघरलेला हा रानफुलांचा नैसर्गिक ठेवा पावसाळी पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय होत आहे.

सह्याद्रीमधील ही वनसंपदा जतन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. सध्या अतिचराई, अनियोजित पर्यटन, खाणकाम, जंगलतोड व इतर कारणांचा धोका या ठिकाणी असणाऱ्या जैवविविधतेला होत आहे. सह्याद्रीमध्ये उगम पावलेल्या नद्यावरच पश्चिम महाराष्ट्राचे अर्थकारण अवलंबून असल्याने जैवविविधतेने नाटलेला हा भाग सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. - प्रमोद कुंभार - अरण्य वाचक व निसर्ग अभ्यासक

Web Title: Tourists are fascinated by the flowers blooming on the hills and hillsides of Bhudargad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.