जीएसटीमुळे कर आकारणीत पारदर्शीपणा

By admin | Published: March 23, 2017 12:33 AM2017-03-23T00:33:44+5:302017-03-23T00:33:44+5:30

के. के. श्रीवास्तव : सेंट्रल एक्साईज व सेवाकर खात्यातर्फे जीएसटी मार्गदर्शन कार्यशाळा

Transparency in taxation tax due to GST | जीएसटीमुळे कर आकारणीत पारदर्शीपणा

जीएसटीमुळे कर आकारणीत पारदर्शीपणा

Next

कोल्हापूर : आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण तसेच संपूर्ण देशात एकसारखी कर व्यवस्था अस्तित्वात आल्याने कर आकारणीत पारदर्शीपणा येणार आहे. तरी व्यापारी, उत्पादक, उद्योजकांनी जीएसटी करप्रणालीत नोंदणी करून सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त के. के. श्रीवास्तव यांनी बुधवारी केले.
येथील सेंट्रल एक्साईज व सेवाकर विभागातर्फे जीएसटी मार्गदर्शन कार्यशाळा झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहआयुक्त धर्मेंद्र प्रताप सिंग, सहायक आयुक्त चंद्रकांत केदार उपस्थित होते.
श्रीवास्तव म्हणाले, जीएसटी अर्थात वस्तू व सेवाकर दि. १ जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे कर आकारणीत सुटसुटीतपणा येऊन देशभरात एकच करप्रणाली अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादनवाढीस चालना मिळेल. उत्पादन ते ग्राहकांच्या हाती पोहोचेपर्यंत टप्प्या-टप्प्यांवर गोळा करण्याच्या क्लिष्ट पद्धतीपेक्षा ही पद्धत सुटसुटीत होऊन जाईल तसेच सर्व उत्पादनांचे विक्रीमूल्य सारखे बनून संपूर्ण देशच एक मोठी बाजारपेठ म्हणून समोर येणार आहे.
या करप्रणालीमुळे ग्राहक, उत्पादन, व्यवसायासह सामान्य माणसांचाही फायदा होणार आहे. करांचा बोजा कमी झाल्याने उत्पादनांचा दर्जा व गुणवत्तेत सुधार होईल. जीएसटीमुळे जीडीपीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ होईल, असा जागतिक बँकेचा अंदाज आहे.
सहआयुक्त सिंग म्हणाले, सोळा कर एकत्रित असलेल्या जीएसटीमुळे कर आकारणी प्रणालीत सोपेपणा येणार आहे. सर्व प्रक्रिया आॅनलाईन होणार असल्याने कररचना पद्धत पारदर्शी होईल तसेच करचुकवेगिरीस आळा बसणार आहे. सरकारचे उत्पन्न वाढल्याने सामाजिक सुरक्षा,
मूलभूत सोयी-सुविधांच्या उभारणीत सरकारला अधिक निधी उपलब्ध होणार आहे तरी व्यापारी व उद्योजकांनी जीएसटी
करप्रणालीत नोंदणी करून त्यामध्ये सहभागी व्हावे.
सहायक आयुक्त दुर्गेश साळुंखे यांनी जीएसटी मायग्रेशन व आॅथराईज्ड इकॉनॉमिक आॅपरेटर याविषयी मार्गदर्शन करत नोंदणी प्रक्रियेविषयी शंकांचे निरसन केले. यावेळी व्यापारी, उत्पादक, सराफ बिल्डर्स, सीए असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


नोंदणीसाठी : महत्त्वाच्या गोष्टी
जीएसटी करप्रणालीत नोंदणीसाठी व्यापारी, उत्पादकांची किमान उलाढाल वीस लाख रुपये असावी. ६६६.ॅ२३.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर आॅनलाईन नोंदणीसाठी अर्ज करताना पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडीसोबत असावा. प्राथमिक माहिती भरल्यानंतर पॅनकार्डची सत्यता पडताळून पाहिली जाईल व प्रोव्हिजनल आयडी व पासवर्ड दिला जाईल.

त्यानंतर आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार आवश्यक ती कागदपत्रे सेंट्रल एक्साईज व सेवाकर खात्याच्या कार्यालयात जमा करावी लागतील. अधिक माहितीसाठी व मदतीसाठी कसबा बावडा मार्गावरील विक्रीकर भवनमधील वस्तू व सेवाकर मदत कक्षाशी संपर्क साधावा.

Web Title: Transparency in taxation tax due to GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.