म्युकरच्या ६४ रुग्णांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:21 AM2021-05-30T04:21:06+5:302021-05-30T04:21:06+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील ६४ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यातील ३६ ...
कोल्हापूर जिल्ह्यातील ६४ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यातील ३६ रुग्णांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू असून आतापर्यंत सीपीआरमध्ये १४ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ८० रुग्णांना म्युकरची लागण झाली. त्यातील १० जणांनी या आजारावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सीपीआरमधील ४ रुग्ण हे इतर खासगी आणि विश्वस्त रुग्णांलयांमध्ये उपचारासाठी गेले आहेत.
शनिवारी तीन रुग्ण नव्याने आढळले आहेत. शासनाने महात्मा फुले आरोग्य योजनेतून जिल्ह्यातील चार आणि बेळगाव येथील केएलई रुग्णालयाला म्युकरच्या उपचारासाठी परवानगी दिल्यामुळे त्या ठिकाणीही रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
चौकट
दिवसभरात ४८०० जणांना लस
दिवसभरामध्ये जिल्ह्यातील ८० केंद्रांवर ४ हजार ८०५ नागरिकांना लस देण्यात आली आहे. यातील ४४९९ जणांना पहिला तर ३०६ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. गेले तीन दिवस लस न आल्याने आता जास्तीत जास्त २ हजार डोस जिल्ह्यात शिल्लक आहेत.