खासदार धैर्यशील मानेंची तिरंगा रॅली, महामार्गावर ट्रॅफिक जाम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 12:43 PM2022-08-14T12:43:17+5:302022-08-14T12:43:58+5:30
भव्य अशी ही रॅली असून दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर तिरंगे लावण्यात आले असून या रॅलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार आहे.
कोल्हापूर : शिंदे गटाला जाऊन मिळालेले खासदार धैर्यशील माने बंड केल्यानंतर कोल्हापुरात पहिल्यांदाच आज येत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. या रॅली मध्ये अनेक कार्यकर्ते, युवक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. खासदार धैर्यशील माने कोल्हापुरात येत असल्याने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये आज सगळ्यात मोठी तिरंगा रॅली काढण्यात येत आहे.
भव्य अशी ही रॅली असून दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर तिरंगे लावण्यात आले असून या रॅलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार आहे. कोल्हापुरातील ही सर्वांत मोठी तिरंगा रॅली असून किनी टोल नाक्यापासून या रॅलीला सुरुवात होणार असून पेठवडगाव मध्ये याची सांगता होणार आहे.
ट्रॅफिक जॅम
या रॅली साठी किणी टोल नाक्यावर नागरिक तासाभरापासून थांबले असून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहंनाच्या रांगा मात्र ह्या रॅलीमुळे लागल्या आहेत. तर पुण्याहून निघालेले खासदार धैर्यशील माने स्वतः ह्याच ट्रॅफिक मध्ये अडकले आहेत अशी माहिती मिळाली आहे.