खंडणी मागणारे दोन डॉक्टर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 08:08 PM2017-09-08T20:08:32+5:302017-09-08T20:11:58+5:30

लोणंद/फलटण : आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याच्या कारणावरून प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील सरकारी अधिकाºयाला ब्लॅकमेल करून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाºया डॉक्टरला

Two doctors demanding the ransom | खंडणी मागणारे दोन डॉक्टर गजाआड

खंडणी मागणारे दोन डॉक्टर गजाआड

Next
ठळक मुद्दे पत्नीचा गर्भपात केल्याच्या आरोपाखाली ब्लॅकमेल तरडगावात पोलिसांची कारवाईगर्भपाताशी संबंधित सर्व कागदपत्रे डॉक्टर प्रवीण कदम याने माहिती अधिकाराखाली मागवून घेतली

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणंद/फलटण : आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याच्या कारणावरून प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील सरकारी अधिकाºयाला ब्लॅकमेल करून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाºया डॉक्टरला त्याच्या सहकाºयासह अटक करण्यात आली.डॉ. प्रवीण कदम (रा. गलांडेवाडी, बारामती), डॉ. नितीन टेळे (रा. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.

याबाबत अधिक महिती अशी की, पशुवैद्यकीय अधिकारी प्रवीण कदम याची पत्नी शुभांगी यांना काही दिवसांपूर्वी तरडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या शुभांगी यांचा त्या ठिकाणी गर्भपात झाला. त्यानंतर गर्भपाताशी संबंधित सर्व कागदपत्रे डॉक्टर प्रवीण कदम याने माहिती अधिकाराखाली मागवून घेतली. तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनिल कदम यांना प्रवीणकडून वेळोवेळी धमक्या येऊ लागल्या. व्हॉट्सअ‍ॅपवरून विचित्र मेसेजही फिरू लागले. या गोष्टीला कंटाळून अनिल कदम यांनी प्रवीणचा मोबाईल नंबर ब्लॉक केला.

सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कमिटीने या प्रकरणाची चौकशी केली. डॉक्टर अनिल कदम यांनी केलेले उपचार व्यवस्थित असल्याचा अहवालही या कमिटीने दिला. मात्र, डॉ. अनिल कदम यांच्यावर कारवाई होण्यासाठी उपोषण करणार असल्याची तक्रार आरोग्यमंत्र्यांकडे प्रवीणने केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी प्रवीणचा सहकारी मित्र डॉ. नितीन टेळे याने फोन करून पंधरा लाखांची मागणी केली. अनिल कदम यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकरणात गुंतविण्याची धमकी दिली.

अखेर तडजोडाअंती पुन्हा त्यांनी दहा लाख रुपये मागितले. यावर डॉ. अनिल कदम यांनी सहमती दर्शविल्यानंतर हे पैसे फलटण येथे आणून देण्याचे ठरले. दरम्यानच्या काळात डॉ. अनिल कदम यांनी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर सापळा रचण्यात आला. पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह त्यांच्या टीमने तरडगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर या दोघांना पैसे घेताना रंगेहाथ पकडले. स्थानिक गुन्हे शाखेने दोघांनाही लोणंद पोलिसाच्या ताब्यात दिले. या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

नोटांच्या बंडलात कोरे कागद
तरडगाव येथील एका पेट्रोल पंपाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये गुरुवारी सायंकाळी पैसे देण्याचे ठरले. दोन हजार रुपयांच्या खºयाखुºया नोटेखाली कोरे कागद लावून बंडल तयार करण्यात आले. त्या ठिकाणी आलेले डॉक्टर प्रवीण आणि डॉक्टर नितीन या दोघांनी खंडणीच्या स्वरुपातील सुमारे आठ हजार रुपयांची ही रक्कम स्वीकारताच आजूबाजूला उभारलेल्या पोलिसांनी या दोघांना रंगेहाथ पकडले. वीस हजारांचे मोबाईलही त्यांच्याकडून जप्त करण्यात आले.

 

 

Web Title: Two doctors demanding the ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.