ठळक मुद्देदोन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याघटना शनिवारी पहाटे उघडकीसअंदाजे दीड लाखाची रक्कम लांबविली
जयसिंगपूर: जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरातील दोन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. अंदाजे दीड लाखाची रक्कम त्यामध्ये होती.
मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दरवाजांच्या वरील काच फोडून मंदिरात प्रवेश केला,पत्र्याच्या दोन दानपेट्या चोरून नेल्या व त्यातील रक्कम लांबविली.
घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञांनी पाहणी केली,चोरीची तक्रार मंदिराचे पुजारी दिलीप जंगम यांनी दिली असून तपास प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक डॉ. सई भोरे-पाटील करीत आहेत. मंदिराचा नुकताच कलशारोहण सोहळा झाला होता.