कोल्हापूर : भाजीपाल्याच्या दरात फारशी चढ-उतार दिसत नसली तरी प्लॉवर दहा रुपयाला दोन गड्डे झाले आहेत. वांगी, दोडका, गवार, भेंडी, कारली या प्रमुख भाज्यांच्या दर स्थिर असून मेथीची पेंढी वीस रुपयाला तीन आहेत. कडधान्य मार्केट काहीसे शांत झाले आहे. सरकी तेलाचे दर १४५ रुपये किलोवर स्थिर असून साखर ३५ रुपये किलोवर आहे.स्थानिक भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने दरात काहीसी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात फारशी चढ-उतार दिसत नसली तरी घाऊक बाजारात कोबी ३, वांगी दहा, टोमॅटो साडेसहा रुपये, ढब्बू पंधरा, रुपये किलो आहे. ओला वाटाणा व गवारचे दर काहीसे तेजीत आहेत.
कोल्हापूरबाजार समितीत कोथंबीरची आवक ५८ हजार ५५० पेंढ्यांची रोज होत आहे. त्यामुळे दर घसरले आहेत. घाऊक बाजारात चार रुपये पेंढीचा दर असून किरकोळ बाजारात दहा रुपये आहे. मेथी, पालक, पोकळ्याची आवकही चांगली असल्याने मेथी वीस रुपयाला तीन पेंढ्या आहेत. टोमॅटोला वीस रुपयाला दीड किलो दर आहे.फळ मार्केटमध्ये द्राक्षे, कलिंगडे, सफरचंदची आवक चांगली आहे. काळ्या पाठीच्या कलिंगडेची आवक जास्त असून किरकोळ बाजारात दहा रुपये दर आहे. सरकी तेल १४५ रूपये किलोवर स्थिर आहे. डाळीच्या दरात फरक झालेला नाही.हापूसची आवक वाढलीहापूस आंब्याची आवक हळूहळू वाढू लागली आहे. कोल्हापूर बाजार समितीत पाच हजार बॉक्सची आवक होत असून सरासरी ३५० रुपये बॉक्सचा दर आहे.कांदा, बटाटा स्थिरकांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यापेक्षा किलोमागे दोन रुपये कमी झाले आहेत. घाऊक बाजारात सरासरी अकरा रुपये किलो दर आहे. बटाट्याच्या दरातही फारशी चढ-उतार दिसत नाही.भाज्यांचे घाऊक बाजारातील किलोचे दर असे-कोबी- ३, वांगी -१०, टोमॅटो -६.५०, ढब्बू -१५, गवार -३२.५०, ओला वाटाणा -३७.५०, कारली-२५, भेंडी-२२.५०, वरणा-२५, दोडका -२०.