कोल्हापूर : खरेदी करण्याच्या बहाण्याने विश्वासघात करून दुचाकी लंपास केल्याची घटना ताराबाई पार्क परिसरात घडली. याबाबत नरेंद्र पटेल (रा. टिंबर मार्केट) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला बुलेट फसवून नेल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अभिषेक दिलीपकुमार भोरे (वय ३४ रा. दादा कचरे हौसिंग सोसायटी, संभाजीपूर, जयसिंगपूर, ता. शिरोळ) यांची दुचाकी संशयित आरोपी नरेंद्र पटेल याने खरेदी करण्याच्या बहाण्याने फसवून नेली, ही घटना ताराबाई पार्कमध्ये शुक्रवारी (दि. ६) दुपारी घडली. याबाबत दुचाकी फसवून नेल्याची तक्रार मंगळवारी सायंकाळी भोरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान, संशयित आरोपी पटेल याने यापूर्वी बुलेट दुचाकी खरेदी करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी त्याला दोन दिवसांपूर्वी अटक केली आहे.