वाशी येथील केंद्रावर १८९० जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:24 AM2021-05-10T04:24:10+5:302021-05-10T04:24:10+5:30

सडोली (खालसा) : वाशी (ता.करवीर) येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर चार गावातील १८९० जणांचे लसीकरण करण्यात आले. ...

Vaccination of 1890 persons at the center at Vashi | वाशी येथील केंद्रावर १८९० जणांचे लसीकरण

वाशी येथील केंद्रावर १८९० जणांचे लसीकरण

Next

सडोली (खालसा) : वाशी (ता.करवीर) येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर चार गावातील १८९० जणांचे लसीकरण करण्यात आले. परंतु तीन आठवड्यापासून केंद्रावर लसीची तुटवडा असल्याने नागरिक आरोग्य विभागाकडे लसीबाबत विचारणा करत आहेत.

राज्य शासन व ग्रामपंचायत प्रशासनाने वाशी येथे कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरुवात करण्यात आली. वाशी, पिरवाडी, शेळकेवाडी, नंदवाळ ग्रामपंचायतीने, आशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग, महसूल प्रशासनाने प्रत्येक गावात जनजागृती करून नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याने लसीकरण केंद्रावर लोकांनी रांगाच रांगा लावल्या.

केवळ पंधरा दिवसात २९३५ पैकी १८९०जणांनी लस घेतली. शेळकेवाडी, १३३ (५१%), पिरवाडी ३९६ (६१%), नंदवाळ ३५६ (५६%), वाशी ९९० (५१%) लसीकरण झाले असून वाशी लसीकरण केंद्रात नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे साठ टक्क्याहून अधिक लसीकरण झाले आहे. परंतु या लसीकरण केंद्रावर गेली तीन आठवड्यांपासून लसीचा तुटवडा असल्याने लसच न आल्यामुळे ४५च्या वरील १०४५ नागरिक लसीच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसऱ्या डोस मिळावा यासाठी ही नागरिक प्रतीक्षेत असून आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासनाकडे लस आली का लस अशी विचारणा लोक करत असल्याने या केंद्रावर लसच उपलब्ध होत नसल्याने नाही हेच उत्तर येत असल्याने नाराजीचे सूर उमटत आहे.

प्रतिक्रिया

आरोग्य विभागाच्या सहकार्याने शेळकेवाडी गाव कोरोना लसीकरणात ८८%पूर्ण झाले असून गेल्या तीन आठवड्यात लस उपलब्ध झाली असती तर ४५ वरील लोकांना लस देऊन गाव शंभर टक्के पूर्ण केले असते. उद्याच्या काळात सर्वानी लसीकरण करून घेण्यासाठी निश्चित लागेल ती मदत आरोग्य विभागाला करण्यात येईल.

रंगराव शेळके

सरपंच ग्रामपंचायत शेळकेवाडी

वाशी येथे लसीकरण केंद्र सुरू केल्याने नंदवाळची गैरसोय थांबली असून आरोग्य विभागाच्या सहकार्याने गावात जनजागृती केली व लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामुळे शक्य झाले आहे.

उत्तम पाटील

ग्रामसेवक नंदवाळ ग्रामपंचायत

Web Title: Vaccination of 1890 persons at the center at Vashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.