कोल्हापूर : गुढीपाडव्यादिवशी संथ असलेली कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम बुधवारी पुन्हा वेगावली. परिणामी पुन्हा लस संपत आली असून गुरुवारपुरतीच लस जिल्ह्यात उपलब्ध आहे. यामुळे बुधवारीही जिल्ह्यातील ७८ केंद्रांवरील लसीकरण बंद राहिले, तर काही केंद्रांवरील लसीकरण दुपारनंतर बंद करावे लागले.
जिल्ह्यातील २३८ लसीकरण केंद्रांपैकी केवळ १६८ हून अधिक लसीकरण केंद्रांवरच बुधवारी लसीकरण झाले. बुधवारी २२ हजार ४१२ नागरिकांनी पहिला, तर २५१८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला.
चौकट
बुधवारचे लसीकरण...
विभाग पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी ६९ ११४
फ्रंटलाईन वर्कर ४४९ २५६
४५ वर्षांवरील नागरिक १४२६१ ५६२
६० वर्षांवरील ७६१३ १५१३
एकूण दिवसभरातील २४९३०
चौकट
एकूण पहिला डाेस घेतलेले नागरिक : ६ लाख ३१ हजार ०८२
दुसरा डोस घेतलेले नागरिक : ४२ हजार ०५८
कोट
कोल्हापूर जिल्ह्यासाठी आठवड्याला २ लाख ८० हजार डोसची मागणी केली आहे. रोज ४० हजार डोस लसीकरण होईल, असे गृहित धरून ही मागणी नोंदवली आहे. उद्या लस येण्याची प्रतीक्षा आहे.
- डॉ. फारूक देसाई
लसीकरण मोहीम समन्वय अधिकारी