चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिनी विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:17 AM2021-06-10T04:17:51+5:302021-06-10T04:17:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, शुक्रवारी विविध सामाजिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाटील हे आज, गुरुवारी वाढदिनी पुण्यात असून ते शुक्रवारी शुभेच्छा स्वीकारणार आहेत. यंदा वाढदिवसाच्या निमित्ताने कणेरी येथील रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
कोल्हापूर येथे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता नंगीवली तालमीच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीस लाकूड प्रदान कार्यक्रम, ११ आणि १२ वाजता अनुक्रमे हॉकी स्टेडियम आणि व्ही. टी. पाटील संकुलाशेजारी भाजप प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून सुरू होणाऱ्या महापालिका संचलित भाजप-ताराराणी आघाडी कोविड सेंटरचे उद्घाटन. दुपारी ३ ते ६ या वेळेत संभाजीनगर येथील निवासस्थानी कणेरीमठ येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पासाठी मदत स्वरूपात शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
शनिवारी १२ जूनला सकाळी साडेदहा वाजता शेंडा पार्क येथील वृक्षांना खत घालणे व स्वच्छता मोहीम. सकाळी ११ वाजता हॉकी स्टेडिअम अस्ट्रोटर्फ मैदानाला भेट, दुपारी १२ वाजता भाजप सरचिटणीस विजय जाधव यांच्या कार्यालयात सामाजिक कार्यक्रमास उपस्थित आणि नंतर दुपारी ३ ते ५ या वेळेत संभाजीनगर निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारणार आहेत.