विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने आजपासून जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:23 AM2021-04-17T04:23:59+5:302021-04-17T04:23:59+5:30
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांमध्ये संचारबंदीच्या काळात विनाकारण वाहने फिरवणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई केली जात होती. आज, शनिवारपासून वाहने ...
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांमध्ये संचारबंदीच्या काळात विनाकारण वाहने फिरवणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई केली जात होती. आज, शनिवारपासून वाहने जप्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी दिले. तसेच जप्त केलेली वाहने संचारबंदीचा काळ संपल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून परत दिली जातील.
राज्य शासनाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. मात्र, विविध कारणे काढून अनेकजण शहरातून फिरत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून त्यांची वाहने परत दिली तर काहींची वाहने अटकावून ठेवली. दरम्यान, कारवाईचा बडगा उगारूनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
चौकट
यजमानांवर गुन्हे दाखल करणार
राज्य शासनाने संचारबंदीच्या काळात केवळ २५ लोकांना लग्नकार्यासाठी उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, या परवानगीचा गैरफायदा मंगल कार्यालये व यजमानही मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत. यात प्रत्येकी २५ जण जेवून गेल्यानंतर दुसऱ्या २५ लोकांची बॅच मंगल कार्यालयात येते. त्यामुळे दिलेल्या परवानगीचा गैरफायदा घेतला जात आहे. यामुळे कोरोना संसर्गही वाढू लागला आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी थेट मंगल कार्यालयांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगल कार्यालये व यजमानांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
दिवसभरातील कारवाई अशी,
मार्निंग वाॅक कारवाई - ४६
विनामास्क - ४०
भादंवि कमल १८८प्रमाणे गुन्हे - ०७
मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे केसेस
पोलीस ठाणे - ३२४
शहर वाहतूक शाखा - १०७८
जप्त वाहने - ११६
फोटो : १६०४२०२१-कोल-बिंदू चौक, ०२
ओळी : कोल्हापुरातील बिंदू चाैकात संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी पोलिसांनी अशी तपासणी मोहीम राबवली.
फोटो : १६०४२०२१-कोल-दाभोळकर काॅर्नर
ओळी : कोल्हापुरातील दाभोळकर काॅर्नर परिसरात संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी शाहुपुरी पोलिसांनी तपासणी मोहीम राबवली. फोटो : १६०४२०२१-कोल-दसरा चौक
ओळी : कोल्हापुरातील दसरा चौकात शुक्रवारी दुपारी पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी तपासणी मोहीम राबवली.
(सर्व छाया : नसीर अत्तार)