कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, आमदार प्रकाश आबीटकर यांची भेट घेऊन ऋतज्ञता व्यक्त केली.
‘गोकुळ’मध्ये अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने २१ पैकी १७ जागा जिंकत सत्तांतर घडवले होते. शुक्रवारी (दि. १४) अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांची निवड झाली. त्यानंतर अध्यक्ष पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सोळांकुर (ता. राधानगरी) येथे जाऊन ए. वाय. पाटील यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांच्या हस्ते विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ‘गोकुळ’चे संचालक प्रा. किसन चौगले, माजी संचालक फिरोजखान पाटील, जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, सरपंच आर. वाय. पाटील आदी उपस्थित होते. मुद्दाळ (ता. भुदरगड) येथे के. पी. पाटील यांची भेट घेतल्यानंतर अध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘गाेकुळ’चे संचालक रणजीतसिंह पाटील उपस्थित होते. गारगोेटी येथे आमदार प्रकाश आबीटकर यांची भेट घेतली. ‘गोकुळ’चे संचालक अभिजीत तायशेटे, नंदकुमार ढेंगे, मारुतीराव जाधव उपस्थित होते. माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह मोरे यांचीही सरवडे येथे भेट घेतली.
फोटो ओळी : ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची भेट घेतली. यावेळी अध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात आला. (फोटो-१७०५२०२१-कोल-गोकुळ)