प्रभाग आरक्षण सोडत शुक्रवारी

By admin | Published: June 29, 2016 12:59 AM2016-06-29T00:59:06+5:302016-06-29T00:59:06+5:30

जिल्हाधिकारी : नगरपालिका निवडणुका

Ward Reservations Dosage Friday | प्रभाग आरक्षण सोडत शुक्रवारी

प्रभाग आरक्षण सोडत शुक्रवारी

Next

कोल्हापूर : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेबाबत जिल्ह्णातील ९ नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्यपदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी (१ जुलै)ला दुपारी ३ वाजता होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले.
जिल्ह्णातील ९ नगरपरिषदांच्या विभागाच्या प्रभागाचे आरक्षण सोडतीचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी देण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी बोलत होते. आरक्षण सोडत काढण्यासंदर्भातील कामकाजाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्णातील पात्र नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागाच्या आरक्षण सोडतीचे कामकाज काटेकोरपणे व्हावे, अशी सूचना करून जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, प्रभाग आरक्षण सोडतीचे काम आयोगाच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शक सूचनांनुसार करावे, यामध्ये कोणतीही हयगय होऊ नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये नगर परिषदेच्या प्रारूप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्यपदाच्या आरक्षणाच्या सोडतीचे कामकाज पारदर्शी व काटेकोरपणे व्हावे, असेही ते म्हणाले.
जिल्ह्णातील नगरपरिषदांच्या प्रभाग आरक्षण सोडत संबंधित नगरपालिका क्षेत्रात निश्चित केलेल्या ठिकाणी होणार आहे. नगरपालिकेचे नाव, आरक्षण सोडतीचे ठिकाण याची माहिती पुढीलप्रमाणे - इचलकरंजी-नगरपालिका सभागृह, मलकापूर-नगरपालिका सभागृह, पन्हाळा-नगरपालिका सभागृह, जयसिंगपूर-सिद्धेश्वर यात्री निवास हॉल, गल्ली नंबर ४, मुरगूड-यशवंतराव चव्हाण सभागृह, नगरपरिषद, कागल-शाहू नगर वाचनालय, कुरुंदवाड-जिम्नॅशियम हॉल, तबक उद्यान, गडहिंग्लज-नगरपालिका सभागृह आणि वडगाव-महालक्ष्मी मंगलधाम, नगरपरिषदेजवळ येथे होणार आहे. सोडत उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

Web Title: Ward Reservations Dosage Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.