कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:31 AM2021-09-07T04:31:09+5:302021-09-07T04:31:09+5:30
कला शाखेतील वर्गांच्या विद्यार्थी संख्या ८० ऐवजी ९० करावी तसेच इतर निकष बदलण्यात यावेत. २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना ...
कला शाखेतील वर्गांच्या विद्यार्थी संख्या ८० ऐवजी ९० करावी तसेच इतर निकष बदलण्यात यावेत. २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी देण्यात यावी. आयटी विषयाला त्वरित अनुदान द्यावे तसेच इतर प्रलंबित प्रश्नासंदर्भात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या एका शिष्टमंडळाने आमदार जयंत आसगावकर यांना निवेदन दिले.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या आहेत. निवडश्रेणीचा लाभ देताना कनिष्ठ महाविद्यालयातील वरिष्ठ श्रेणी मिळालेल्या शिक्षकांच्या कोट्यातील केवळ २० टक्के शिक्षकांना लाभ दिला जातो. त्यामुळे असंख्य शिक्षक निवडश्रेणीपासून वंचित आहेत. अनेक शिक्षक यापासून वंचित राहून सेवानिवृत्त झाले आहेत. हा एक प्रकारे अन्याय आहे या अन्यायप्रश्नी कनिष्ठ शिक्षकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची वेळ शासनाने आणून ठेपली आहे. यावर लवकरच आंदोलन करण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी दिला आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक प्रश्नी एका शिष्टमंडळाने शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना नुकतेच निवेदन दिले. या शिष्टमंडळात प्रा. एस. बी. डेळेकर, राज्यशास्त्र परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी. डी. चौगले ,प्रा. एल. व्ही. शर्मा, प्रा. रोहन पाटील आदींचा समावेश होता.