जयसिंगपूर -: पंचगंगा नदी प्रदुषणप्रश्नी गेल्या २५ वर्षात जे झाले नाही ते महिन्याभरात झाले. लॉकडाऊनच्या काळात नदी पूर्णपणे शुध्द बनली आहे. आता मात्र विनाप्रक्रिया विषारी पाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांना परवानगी देऊ नये. नदी प्रदुषणमुक्तीसाठी यापुढे विषारी पाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांना परवानगी नाकारावी अशी मागणी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवरुन बोलताना केली आहे.अशी माहिती शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी पत्रकारांना दिली.लॉकडाऊनमुळे उद्योग बंद आहेत. विषारी पाणी प्रक्रियेविना सोडणे बंद झाल्यानेच सध्या नदी प्रदुषणमुक्त बनली आहे. आता मात्र, ती अशीच वाहती राहिली पाहिजे. कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्यासह भूमाता परिवाराबरोबर आम्ही अनेक वर्ष यासाठी प्रयत्नशील आहोत. सातत्याने शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पदरी प्रदुषीत पाण्याशिवाय काहीच पडले नाही. आता मात्र काही न करता पंचगंगा शुध्द झाली आहे. शेतीच्या पाटातील पाणी थेट शेतकरी पित आहेत. त्यामुळे विषारी पाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांना परवानगी नाकारावी अशी मागणी, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांना परवानगी देऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 5:06 PM
जयसिंगपूर -: पंचगंगा नदी प्रदुषणप्रश्नी गेल्या २५ वर्षात जे झाले नाही ते महिन्याभरात झाले. लॉकडाऊनच्या काळात नदी पूर्णपणे शुध्द ...
ठळक मुद्देमाजी आमदार उल्हास पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली मागणी