इच्छुकांच्या उत्साहावर फिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:24 AM2021-03-06T04:24:30+5:302021-03-06T04:24:30+5:30
महापालिकेच्या नवे सभागृह गतवर्षी १५ नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक होते; परंतु कोरोनाचा कहर असल्याने ही निवडणूक घेता आली नाही. ...
महापालिकेच्या नवे सभागृह गतवर्षी १५ नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक होते; परंतु कोरोनाचा कहर असल्याने ही निवडणूक घेता आली नाही. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली व त्यानुसार प्रभाग रचना व आरक्षण निश्चित झाले आहे. मतदार यादीवरील हरकतींची सुनावणीही पूर्ण झाली असली तरी १२ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती; परंतु तोपर्यंत गेल्या रविवारीच राज्य मंत्रिमंडळाने या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी त्यास विधिमंडळाने मंजुरी दिली. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. सध्या डॉ. कादंबरी बलकवडे या १५ नोव्हेंबरपासून प्रशासक असून त्यांनाही एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांनी जेवणावळी, भेटवस्तू, सहली, प्रचारपत्रकांच्या माध्यमांतून खर्चाचा धडाका लावला होता.