महापालिकेच्या नवे सभागृह गतवर्षी १५ नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक होते; परंतु कोरोनाचा कहर असल्याने ही निवडणूक घेता आली नाही. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली व त्यानुसार प्रभाग रचना व आरक्षण निश्चित झाले आहे. मतदार यादीवरील हरकतींची सुनावणीही पूर्ण झाली असली तरी १२ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती; परंतु तोपर्यंत गेल्या रविवारीच राज्य मंत्रिमंडळाने या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी त्यास विधिमंडळाने मंजुरी दिली. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. सध्या डॉ. कादंबरी बलकवडे या १५ नोव्हेंबरपासून प्रशासक असून त्यांनाही एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांनी जेवणावळी, भेटवस्तू, सहली, प्रचारपत्रकांच्या माध्यमांतून खर्चाचा धडाका लावला होता.
इच्छुकांच्या उत्साहावर फिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:24 AM