कागल : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादक सभासदांनी मोठ्या विश्वासाने सत्तांतर केले. याची जाणीव ठेवून आम्ही तेथे होत असलेल्या अवाढव्य खर्चाला पायबंद घातला. निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची सुरुवात केली आहे. सध्या गोकूळ दूधसंघ हा देशात २७ व्या नंबरला आहे. त्याला अमूलच्या बरोबरीने एक नंबरला आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास गोकूळचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
गोकूळच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल येथील गहिनीनाथ सहकार समूहाच्या वतीने नवीद यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा बॅंकेचे संचालक भय्या माने, समूहाचे अध्यक्ष सम्राट सणगर, संभाजीराव कोरोणे, अमर सणगर प्रमुख उपस्थितीत होते. या वेळी गहिनीनाथ दूध संस्थेच्या सभासदांना किटली वाटप आणि कै. दिलीपराव सणगर पतसंस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सर्व बॅंकांच्या ए.टी.एम. सेंटरचे उद्घाटन नवीद यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास गहिनीनाथ विकास सोसायटीचे अध्यक्ष संभाजी कोराणे, उपाध्यक्ष बाळासो बोधले, दिलीपराव सणगर पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक केसरकर, संचालक उदय काटकर, सचिव मारुती शेंडे, मजीद पटेल, महेश मगदूम, यशवंत डोणे, भिकाजी बन्ने, प्रियदर्शन पाटील, कोमल सणगर, सुवर्णा कचरे आदी उपस्थित होते.
चौकट
म्हैस दुधाला प्राधान्यच
गहिनीनाथ दूध संस्थेचे अध्यक्ष अमर सणगर याांनी गोकूळचे वतीने दुूध उत्पादकांसाठी म्हैस कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केेेेली. याचा संदर्भ देत नवीद मुश्रीफ म्हणाले की, म्हैस दूधवाढीबद्दल प्राधान्यक्रम आहेच. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्जाच्या विविध योजना आणल्या आहेत. त्यातून म्हैशी खरेदी करता येतील.
फोटो कॅप्शन :
कागल येथील गहिनीनाथ सहकार समुहाच्यावतीने गोकूळचे संचालक नवीद मुश्रीफ यांचा सत्कार संभाजीराव कोराणे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी सम्राट सणगर, अमर सणगर, बाळासोा बोधले उपस्थित होते.