कुंभोज, दि. १९ (वार्ताहर) :
हिंगणगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असून गावाचे आराध्य दैवत तसेच नदीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आपण लवकरच निधी देऊ, असे आश्वासन आमदार राजू बाबा आवळे यांनी दिले. हिंगणगाव, ता. हातकणंगले येथे पंचवीस-पंधरा योजनेंतर्गत प्राप्त पाच लाख रुपये निधीतून अंतर्गत रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी हिंगणगाव आतील अपूर्ण रस्ते पूर्ण करण्याची मागणी गटप्रमुख अजित पाटील, सरपंच शीला अनिल पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार राजू बाबा आवळे यांच्याकडे केली.
आमदार आवळे यांचा अजित पाटील यांच्याहस्ते सत्कार केला. यावेळी उपसरपंच यासीन जमादार, किरण माळी, चेतन चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक प्रमोद मुसळे, सुकुमार देसाई, विश्वास कोळी, महावीर पाटील, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
१९ कुंभोज आवळे न्यूज