पूरग्रस्त उद्योगांचे पंचनामे करण्यास प्रांताधिकाऱ्यांना सूचना देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:28 AM2021-08-20T04:28:01+5:302021-08-20T04:28:01+5:30
पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिये, शिरोली नदीकाठचे पूरग्रस्त उद्योजक, शेतकऱ्यांशी साधला संवाद लोकमत न्यूज नेटवर्क शिये : ...
पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिये, शिरोली नदीकाठचे पूरग्रस्त उद्योजक, शेतकऱ्यांशी साधला संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
शिये : शिरोली परिसरातील ऊस पिकाचे पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे- भांबुरे यांना दिल्या असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते.
शिये येथील हनुमान नगर परिसरातील नदीकाठच्या शेतकऱ्यांचे महापुरामध्ये मोठे नुकसान झाले आहे. हनुमान नगरमधील पूरग्रस्त बांधव आणि शेतकरी यांच्याशी संवाद साधण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. ग्रामपंचायत सदस्य तेजस्विनी पाटील यांनी परिसरातील ऊस पिकाच्या झालेल्या नुकसानासंदर्भात माहिती दिली. यावेळी उद्योजक सरदार जाधव, महादेव जाधव, सुदर्शन गाडवे, रमेश तासगावकर, अमर जाधव, पांडुरंग गाडवे, आनंद कांबळे, रमेश इंगवले, बापू पाटील, अमोल मोरे, गंगाराम कांबळे, नामदेव जाधव, दिनेश तासगावकर, आप्पा गवंडी, शोभा गाडवे, शुभांगी इंगवले, यशोदा पाटील, रवींद्र अतिग्रे, राजू मोरे, अल्ताफ मुजावर, रमेश गाडवे, उमेश गाडवे यांच्यासह उद्योजक, शेतकरी उपस्थित होते.
१९ शिये पूर पाहणी
फोटो
शिये पूरग्रस्त भागातील नुकसानाची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, तेजस्विनी पाटील, सुदर्शन गाडवे, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.