कोल्हापूर: खंडपीठाबाबत लवकरच मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिष्टमंडळाला दिली ग्वाही

By तानाजी पोवार | Published: July 25, 2022 06:24 PM2022-07-25T18:24:33+5:302022-07-25T18:30:19+5:30

खंडपीठ कृती समिती व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विमानतळावर भेट घेऊन निवेदन दिले.

We will soon meet Chief Justice Dipankar Dutta regarding setting up a Circuit Bench of the Bombay High Court in Kolhapur, Chief Minister Eknath Shinde testified | कोल्हापूर: खंडपीठाबाबत लवकरच मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिष्टमंडळाला दिली ग्वाही

कोल्हापूर: खंडपीठाबाबत लवकरच मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिष्टमंडळाला दिली ग्वाही

googlenewsNext

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात स्थापन करावे यासंदर्भात आपण लवकरच मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांची भेट घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर सर्किट बेंचबाबत आपल्याला माहिती आहे, सर्किट बेंचबाबत आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने चंद्रकांतदादांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, सोमवारी दुपारी विशेष विमानाने कोल्हापूर दाखल झाले. यावेळी त्यांची खंडपीठ कृती समिती व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त शिष्टमंडळाने विमानतळावर भेट घेऊन निवेदन दिले.

चर्चेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,  मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे यासाठी प्रदीर्घ काळ लढा सुरू आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षकार व वकिलांची खंडपीठासाठी आग्रही मागणी आहे, याची आपल्याला माहिती आहे. त्याबाबत आपण लवकरच मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. शिष्टमंडळामार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देण्यात आले.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅड . गिरीश खडके, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड . विवेक घाडगे, अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. प्रकाश मोरे, अॅड . प्रशांत चिटणीस आदी उपस्थित होते.

Web Title: We will soon meet Chief Justice Dipankar Dutta regarding setting up a Circuit Bench of the Bombay High Court in Kolhapur, Chief Minister Eknath Shinde testified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.