विद्यापीठाच्या अधिसभेत बुधवारी वादळी चर्चा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:24 AM2021-03-08T04:24:14+5:302021-03-08T04:24:14+5:30
डिसेंबरमध्ये झालेल्या प्रशासनाने चुकीची माहिती दिल्यावरून विद्यापीठ विकास आघाडीने, तर प्रश्न नाकारल्याच्या कारणावरून विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) अधिसभेवर प्रश्नोत्तराच्या ...
डिसेंबरमध्ये झालेल्या प्रशासनाने चुकीची माहिती दिल्यावरून विद्यापीठ विकास आघाडीने, तर प्रश्न नाकारल्याच्या कारणावरून विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) अधिसभेवर प्रश्नोत्तराच्या तासामध्ये बहिष्कार टाकला होता. या दोन्ही संघटनांनी एकाच सभेत बहिष्कार टाकण्याचा प्रकार यावेळी पहिल्यांदा घडला होता. या सभेत अधिविभागांमधील वाद आणि राजकारण, ठरावांची अंमलबजावणी, आदींवरून खडाजंगी झाली होती. बुधवारी होणाऱ्या सभेत पेपरफुटी प्रकरण, ठरावांची अंमलबजावणी, अधिसंख्य पदांचा मुद्दा, कोरोनाच्या काळात विद्यापीठ प्रशासनाने घेतलेले निर्णय, आदींबाबत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. संशोधन, शिक्षणासह विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आदींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठीच्या यावर्षीच्या सुमारे ५१० कोटींच्या अंदाजपत्रक हे फेब्रुवारीमध्ये झालेल्या विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने अधिसभेत मांडण्यास शिफारस केली होती. हे अंदाजपत्रकदेखील या अधिसभेमध्ये मांडण्यात येणार आहे.