शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

सोलापूरचे झाले, मग कोल्हापूरला का नाही?

By admin | Published: April 22, 2015 12:03 AM

विमानसेवेचा प्रश्न रखडला : पाठपुरावा थांबला; शहरवासीयांतून नाराजी

कोल्हापूर : मुंबई-सोलापूर-मुंबई अशी जूनपासून विमानसेवा सुरू होण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. सोलापूरमधून १९ आसनक्षमतेच्या विमानाद्वारे सेवा पुरविण्यास खासगी कंपनी तयार होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होण्याची निव्वळ चर्चा सुरूच आहे. कंपनी येते, सर्व्हे करते आणि ठरावीक प्रवासी रोज मिळाले पाहिजेत, अशी अट घालते. त्यासह आश्वासनाशिवाय दुसरे काही झालेले नसल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा याबाबत कमी पडत असल्याने विमानसेवा प्रारंभाचा प्रश्न रखडल्याची नाराजी कोल्हापूरकरांतून व्यक्त होत आहे.कोल्हापूरच्या औद्योगिक, व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने विमानसेवा सुरू होण्याची आवश्यकता आहे. ते लक्षात घेऊन विमानसेवा पुरविण्यासाठी जेट एअरवेजने गेल्या चार महिन्यांपूर्वी तयारी दर्शविली. त्यानुसार ‘जेट एअरवेज’ने सर्व्हे केला. त्यातून कंपनीने कोल्हापूरहून मुंबईला जाताना ४०, तर मुंबईहून कोल्हापूरला येताना ४५ प्रवासी रोज देण्याची हमी कोल्हापुरातील उद्योजक-व्यावसायिक संघटनांनी द्यावी; तसेच तिकीट दर सात हजार रुपये राहील, अशा काही तत्त्वत: अटी ठेवल्या. पण, साडेतीन ते साडेचार हजार रुपयांपर्यंत तिकीट दर सोयीस्कर असल्याचे स्थानिक उद्योजक, व्यावसायिक आणि प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यातच विमानसेवेचा प्रारंभ अडकला. त्यानंतर एक महिन्यांपूर्वी ‘एअर इंडिया’ने विमानसेवा सुरू करण्याबाबत सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांना रोज ५० ते ५५ प्रवाशांची हमी हवी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरणारा आहे. (प्रतिनिधी)