पितृपक्षाने काय बरं घोडं मारलंय..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:23 AM2021-09-25T04:23:59+5:302021-09-25T04:23:59+5:30

कोल्हापूर : पितृपंधरवड्यात लोक कोणतेच शुभ काम करत नाहीत. त्यामुळे या पितृपक्षाने नेमकं काय घोडं मारले आहे असा प्रश्न ...

Why did the patriarch kill the horse ..? | पितृपक्षाने काय बरं घोडं मारलंय..?

पितृपक्षाने काय बरं घोडं मारलंय..?

Next

कोल्हापूर : पितृपंधरवड्यात लोक कोणतेच शुभ काम करत नाहीत. त्यामुळे या पितृपक्षाने नेमकं काय घोडं मारले आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कुटुंबातील निधन झालेल्या पितरांच्या कर्मांसाठी राखीव असलेल्या पितृपक्षात विवाह, कौटुंबिक समारंभ, वास्तू खरेदी-विक्री, वास्तुशांत, मुलगी बघणे-ठरवणे, साखरपुडा एवढेच काय चांगले कार्य कधी करावे याची चर्चादेखील केली जात नाही. एकीकडे पितरांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांच्या नावे श्राद्धकर्म करायचे आणि दुसरीकडे हा कालावधी शुभकार्यासाठी निषिद्ध अशी चुकीची मानसिकता समाजात आहे.

दरवर्षी भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशी झाली की एक दिवसाने महालय म्हणजेच पितृपंधरवडा सुरू होतो. या दिवसापासून ते सर्वपित्री अमावास्यापर्यंतच्या पंधरा दिवसांत कुटुंबातील वारलेल्या व्यक्तीच्या नावाने त्या त्या तिथीला श्राद्ध घातले जाते, त्यांच्या नावे पूजा करून कावळ्याला नैवेद्य दिला जातो. पितरांचा कायम आपल्या कुटुंबावर कृपाशीर्वाद असावा म्हणून हा विधी करण्याची पद्धत आहे. पण त्याची दुसरी बाजू ही आहे की या काळात एकही शुभकार्य केले जात नाही. हा काळ देवदेवतांच्या उपासनेसाठी, धार्मिक विधींसाठी निषिद्ध मानला गेला आहे. मुलगा-मुलीचे लग्न ठरवायचे आहे, तर साधा बायोडाटादेखील या काळात कुणाला पाठवला जात नाही. बारसं, वास्तुशांत, लग्नसमारंभ, घराची खरेदी, कौटुंबिक सोहळे या बाबी तर खूपच लांबची गोष्ट. घरात एखादी नवीन वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने घ्यायचे असले तरी हे टाळले जाते.

---

बाजारपेठाही थंड

ग्राहकांची ही मानसिकता असल्याने या दिवसात बाजारपेठेतील उलाढालदेखील कमी होते. पुढे नवरात्रोत्सवापासून सगळे व्यवहार पूर्वपदावर येतात. ग्राहकांसाठी प्रोत्साहन योजनाही या काळात दिल्या जात नाहीत.

---

हे कशातून सुरु झाले..

वर्षभर देवतांचे विधी-उपासना केल्या जातात. पण पितृपक्ष हा पितरांसाठी राखीव आहे. कोणतेही शुभकार्य म्हटले की धार्मिक विधी, देवदेवतांची उपासना आलीच. या कार्यांमुळे पितरांचा विसर पडू नये, त्यांच्या पूजेला गौणत्व येऊ नये म्हणून या काळात शुभकार्य टाळले जाते. लोकांच्या मनात त्यातून कधीकाळी गैरसमज तयार झाला आहे आणि पिढ्यानपिढ्या तो आपली पाठ सोडायला तयार नाही.

पितृपक्ष म्हणजे अमंगल, वाईट काळ ही भावना आधी मनातून काढून टाकली पाहिजे. पितरांच्या नावे श्रद्धेने केलेले कर्म म्हणजे श्राद्ध हा याचा खरा अर्थ आहे. वारलेल्या व्यक्तींचे आपल्या कुटुंबावर कायम आशीर्वादच असतात. त्यामुळे या काळात काही चांगले केले की वाईट घडते ही चुकीची मानसिकता लोकांच्या मनात आहे.

ॲड. प्रसन्न मालेकर

धार्मिक प्रथापरंपरांचे अभ्यासक

---

Web Title: Why did the patriarch kill the horse ..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.