बाबासारखे पोलीस, डॉक्टर होणार का; मुले म्हणतात नको रे बाबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:25 AM2021-05-18T04:25:06+5:302021-05-18T04:25:06+5:30

कोल्हापूर : कोरोना महामारीचा प्रचंड ताण सध्या पोलीस आणि आरोग्य यंत्रणेवर आहे. त्यांच्या कामाचे तास वाढले आहेत, घरच्यांसाठी वेळ ...

Will there be a policeman like Baba, a doctor; The children say no, Dad! | बाबासारखे पोलीस, डॉक्टर होणार का; मुले म्हणतात नको रे बाबा!

बाबासारखे पोलीस, डॉक्टर होणार का; मुले म्हणतात नको रे बाबा!

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोना महामारीचा प्रचंड ताण सध्या पोलीस आणि आरोग्य यंत्रणेवर आहे. त्यांच्या कामाचे तास वाढले आहेत, घरच्यांसाठी वेळ देणेही तितके कठीण बनले आहे. या बाबींचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आई-बाबासारखे पोलीस, डॉक्टर होणार का? या प्रश्नावर बहुतांशी मुलांनी ‘नको रे बाबा’ असाच सूर काढला.

कोरोनाचा प्रार्दुभाव सुरू आहे. कोरोना रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी डाॅक्टरसह आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. नागरिकांचेही रक्षण करण्यासाठी पोलीस दिवस-रात्र रस्त्यावर थांबून आहे. दोन्हीही यंत्रणेला कुटुंबाकडे पुरेसा वेळ देता येत नाही. परिणामी, त्याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे बहुतांशी मुलांनी, भविष्यात काय व्हायचे आहे? या प्रश्नावर त्यांनी, पोलीस, डाॅक्टर, नको रे बाबा अशाच प्रतिक्रियेचा सूर काढला.

पोलीस व्हायला आवडेल पण..

कोट...

पप्पा व मम्मीला ड्यूटीला जाऊ नका, खेळूया म्हणून सांगितलं तरी ते जातातच. मी एकटीच घरी असते किंवा मम्मीसोबत पोलीस ठाण्यात जाते. त्यात कोरोनाची भीती. म्हणून पोलिसाची नोकरी नको मी तर आर्मीत जाणार. - श्रीनिवास देवानंद बल्लारी

कोट...

पप्पा पोलीस स्टेशनलाच जातात, घरात कधी नसतातच, माझ्याशी खेळतही नाहीत. ते चांगले काम करतात, त्यामुळे मला पोलीस व्हायला आवडेल. पण कोरोनाची भीती वाटते - शेजल अजय नाईक

कोट..

चाचा दिवसभर घराबाहेरच असतात, आमची भेटही होत नाही. भ्यासही घेत नाहीत, कोरोनातही आम्हाला चाचांची भीती वाटते. मलाही पोलीस व्हायचे आहे, पण त्यापेक्षा शिक्षक होणे अधिकपणे आवडेल. - जरीन आवळकर

कोरोना असेल तर डॉक्टरकी नको!

कोट...

माझी मम्मी डॉ. माहेश्वरी यांच्याप्रमाणेच मलाही डॉक्टर व्हायचं आहे. रुग़्ण बरा झाल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो. त्यामुळे मलाही पप्पा-मम्मीसारखच वैद्यकीय क्षेत्रात काम करायचे आहे. - अनुष्का प्रकाश बारड

कोट...

पप्पा डॉक्टर असले तरीही मला ऑपरेशनची फार भीती वाटते, त्यात माझ्यासोबत खेळण्यास फार कमी वेळ मिळतो. त्यामुळे मला डॉक्टर नको तर कोर्डींग फॉर गेम्स ॲप डेव्हलपर्स बनायचे आहे. - आर्यन प्रसन्ना पवार

कोट..

बाबा आमच्यासाठी थोडाच वेळ काढतात, ते नेहमीच हॉस्पिटलमध्ये असतात. मलाही डॉक्टर व्हायचे आहे, पण त्यापेक्षा मी पोलीस होऊन चोरांना पकडणार आहे. - वरक प्रकाश देशपांडे

कोट...

डॉक्टर व पोलीस हे समाजोपयोगी कामासाठी जास्त वेळ घराबाहेरच असतात. त्यात कोरोनाची धास्ती आहे. घरात काळजी घेणारी स्वतंत्र कौटुंबिक व्यवस्था नसेल तर मात्र मुलांच्या मानसिकतेवर काहीअंशी परिणाम होऊ शकतो. तरीही अनेक मुलांना आपले आई-वडील हे निश्चितपणे रोल मॉडेल असतात. - डॉ. शुभदा दिवाण, मानसोपचारतज्ज्ञ

- कोरोना योद्धे शासकीय रुग्णालयातील डॉक्टर : ३७९; आरोग्य कर्मचारी : १७८१

- पोलीस अधिकारी : १७२; पोलीस कर्मचारी : २२२०

Web Title: Will there be a policeman like Baba, a doctor; The children say no, Dad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.