कोरोना संकट काळात डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:24 AM2021-05-13T04:24:20+5:302021-05-13T04:24:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोना संकट काळात आरोग्य सेवेसाठी जिवाची पर्वा न करता स्वत:ला झोकून देऊन आपले कर्तव्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोना संकट काळात आरोग्य सेवेसाठी जिवाची पर्वा न करता स्वत:ला झोकून देऊन आपले कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, परिचारक व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.
येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात मंगळवारी (दि. ११) तांत्रिक बिघाडामुळे हायफ्लो मशीनला आग लागल्याची घटना घडली. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारक, परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेची माहिती घेऊन पाहणी करत आमदार आवाडे यांनी तत्परता दाखविलेल्या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. यावेळी आरोग्य सभापती संजय केंगार, भरत शिंदे, जितेंद्र साळुंखे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
१२०५२०२१-आयसीएच-०१
आयजीएम रुग्णालयात तत्परता दाखविलेल्या डॉक्टर व परिचारिकांचे आमदार प्रकाश आवाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.