कणेरी : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील युरोटेक्स इंडस्ट्रीज व्यवस्थापनाविरुद्ध कामगारांची पगारवाढ व इतर मागण्यांसंदर्भात शाहू सूत कापड कामगार संघटनेच्यावतीने गेले २७ दिवस बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, मिल व्यवस्थापनाने याबाबत दखल घेतलेली नाही. त्यामुळे मंगळवारी (दि. १०) सकाळी आठ वाजल्यापासून युरोटेक्स इंडस्ट्रीज व्यवस्थापनाविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले आहे.कंपनी गेटसमोर सकाळी आठ वाजता कामगारांची सभा होऊन आमरण उपोषणाला सुरुवात झाली. विजयकुमार कोकाट, शाहू सूत कापड कामगार संघाचे अध्यक्ष सिकंदर नायकवडी, युनिट अध्यक्ष दाजी चव्हाण हे आमरण उपोषणासाठी बसले आहेत.यावेळी विजयकुमार कोकाटे म्हणाले, युरोटेक्स कंपनी अनाठायी पैसा खर्च करते. २७ वर्षांत कंपनीने फायद्याबाबतची कोणतीही नोटीस बोर्डवर लावलेली नाही. स्टाफचा पगार प्रत्येक वर्षी वाढविताना व्यवस्थापन तोट्यात नसते; परंतु कामगारांना चार वर्षांतून एकदा पगारवाढ करताना मात्र कंपनी तोट्यात असते. कामगारांच्या पिळवणुकीसाठीच व्यवस्थापनाने नियोजन करून हा रचलेला डाव आहे.यावेळी अरविंद सूतगिरणी कामगार संघटनेचे युनिट अध्यक्ष प्रकाश ऐकवडे, सतीश पाटील, इंडोकाऊंट सूतगिरणी कामगार संघटनेचे युनिट अध्यक्ष विठ्ठल हुजरे, अमित स्पिनिंग मिल कामगार संघटनेचे युनिट अध्यक्ष राजाराम भिवसे, विल्सन मंथेरो, अनिल आवळे, आदींसह कामगार उपस्थित होते. कंपनी गेटसमोर दिवसभर कामगारांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भजन करून, कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील युरोटेक्स इंडस्ट्रीज व्यवस्थापनाविरुद्ध कामगारांचे पगारवाढ व इतर मागण्यांसंदर्भात शाहू सूत कापड कामगार संघटनेच्यावतीने बेमुदत साखळी उपोषण गेले २७ दिवस सुरू असून, त्याची संबंधित मिल व्यवस्थापनाने कोणतीही दखल घेतलेली नाही, म्हणून मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून युरोटेक्स इंडस्ट्रीज व्यवस्थापनाविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले आहे.
‘युरोटेक्स’ विरोधात कामगारांचे आमरण उपोषण
By admin | Published: January 11, 2017 12:52 AM