याबाबत अधिक माहिती अशी की शशिकांत याने विहिरीत उडी टाकण्याच्या अगोदर तासभर
हाताची नस कापून व गळ्यावर ब्लेडने वार करून घेतले होते. त्यानंतर त्याने घराच्या पाठीमागील बाजूला असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तुडये येथील रामनगर परिसरातील कोटओहळकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या लक्ष्मण गेनाप्पा गुरव यांच्या शेतातील घरी राहत होता . मध्यरात्रीच्या सुमारास घरात डाव्या हाताची नस व गळ्यावर ब्लेडने कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामुळे खोलीत रक्ताचा सडा पडला होता . जखमी अवस्थेत त्याने घराच्या मागील बाजूस असणाऱ्या शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले. विहिरीबाहेर त्याचा मोबाइल आढळून आला. घरापासून विहिरीपर्यंत पडलेल्या रक्ताच्या डागांमुळे सकाळी हा प्रकार आई-वडिलांना समजला. चंदगड पोलिसांना घटनेची माहिती दिली. कॉन्स्टेबल जाधव, कॉन्स्टेबल देसाई यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान मुलगी असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.