पेरीडमध्ये शून्य टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:41+5:302021-01-16T04:29:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर: पेरीड ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या ६५ वर्षांपासून बिनविरोध होत आहे. या निवडणुकीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: पेरीड ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या ६५ वर्षांपासून बिनविरोध होत आहे. या निवडणुकीत आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या. प्रभाग एकमध्ये दुरंगी लढत होती. मतदान केंद्रावर मतदान अधिकारी मतदानांची तयारी करून बसले होते; मात्र एकही मतदार मतदान केंद्रावर फिरकला नाही, यामुळे येथे 'शून्य' टक्के मतदान झाले.
निवडणूक आयोगाने मतदानासाठी शासकीय यंत्रणा राबवूनदेखील गावच्या एकीसाठी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. पेरीड गावची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा पायंडा असताना यंदा निवडणूक लागली, त्यामुळे ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. आज मतदान केंद्रावर दिवसभर शुकशुकाट जाणवत होता. या मतदान केंद्रावर ६२९ एवढे मतदान होते. मतदान अधिकारी मतदाराची वाट पाहत होते. दरम्यान, या मतदान केंद्रावर अपर पोलीस प्रमुख तिरुपती काकडे, पोलीस उप-अधीक्षक अनिल कदम, प्रांताधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार गुरु बिराजदार, पो. नि. विजय पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
फोटो १५पेरीड
शाहूवाडी तालुक्यातील पेरीड मतदान केंद्रावर शुकशुकाट जाणवत होता .