अहमदपूर तालुक्यात १०५८ कर्मचाऱ्यांना मिळणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:16 AM2021-01-14T04:16:58+5:302021-01-14T04:16:58+5:30
लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज... अहमदपूर तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १ ग्रामीण रुग्णायल आहे. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी ...
लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज...
अहमदपूर तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १ ग्रामीण रुग्णायल आहे. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी १२, अंगणवाडी सेविका २४८, मदतनीस २४८, आशासेविका १६६, गटप्रवर्तक १०, आरोग्यसेवक २०, आरोग्य सेविका २०, लेडी हेल्थ अधिकारी २०, परिचर २०, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय ८, खासगी डॉक्टर ११३ आणि आरोग्य कर्मचारी १८२ अशी संख्या आहे. या कर्मचाऱ्यांचा डाटा ऑनलाईन करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे शनिवार, दि. १६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
- डॉ. दत्तात्रय बिराजदार,
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर