शनिवारी ६९७ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, यातील ९ जणांचा आहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ तर १ हजार ९४ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असता, त्यातील २१ जणांचा आहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला आहे. शनिवारी नव्या ३० रुग्णांची भर पडली आहे़. दिवसेंदिवस रुगणसंख्येचा आलेख खाली येत आहे. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण आता वाढले आहे. हे चित्र नागरिक, प्रशासनासाठी दिलासादायक आहे. तर रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांवर आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी हा ६१० दिवसांपसवर गेला आहे. परिणामी, लातूर जिल्ह्याला चांगला दिलासा मिळाला आहे. दैनंदिन पाॅझिटिव्हिटी रेट १़९ टक्क्यांच्या घरात आहे. मेकॅनिकल व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णाची संख्या १ आहे. बीआयपीएपी व्हेंटीलेटरवर १२ रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाची संख्या ४१ आहे. अशी एकणू ५४ रुग्णसंख्या आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. लक्ष्मण देशमुख यांनी दिली.
सव्वा सहा लाख नागरिकांची तपासणी...
लातूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचणीचा आकडा हा शनिवारी ६ लाख १८ हजार ३३४ वर गेला. यातील आरटीपीसीआर चाचणीचा आकडा हा २ लाख २९ हजार ६ आहे़ तर रॅपीड अटिजन चाचणीचा आकडा ३ लाख ८९ हजार ३२८ वर गेला आहे. यातील एकूण ९० हजार ५९९ जणांचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला आहे.