कासारशिरसीतील १४ जागांसाठी ३५ उमेदवारांनी ठोकले शड्डू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:00 AM2021-01-08T05:00:05+5:302021-01-08T05:00:05+5:30
कासारशिरसी येथील ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग १ मधून सुरेश बरकंबे, मुमताजबी ...
कासारशिरसी येथील ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग १ मधून सुरेश बरकंबे, मुमताजबी हाजुलाल नासरजंग आणि प्रभाग २ मधून मोनाली मडोळे हे तीन उमेदवार बिनविरोध निघाले आहेत. त्यामुळे उर्वरित १४ जागांसाठी निवडणूक होत आहे. गावात दुरंगी लढत होत आहे. एकूण ३५ उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत.
गावात दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. बॅनर, पत्रकांमुळे गाव ढवळून निघाले आहे, तसेच सोशल मीडियाद्वारे जोरदार प्रचार करण्यात येत आहे.
अपक्षांमुळे डोकेदुखी...
पॅनलच्या उमेदवारांसमोर अपक्षांची डोकेदुखी वाढली आहे. अपक्ष उमेदवार किती मते घेणार, याची गणिते आतापासून करण्यात येत आहेत. दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापू लागले आहे. मतदारांच्या भेटीगाठीवर भर देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मतदान शांततेत पार पडावे म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे सपोनि. रेवनाथ ढमाले यांनी सांगितले.