महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर साडेपाच लाखांची रक्कम जप्त
By संदीप शिंदे | Published: April 27, 2024 04:27 PM2024-04-27T16:27:59+5:302024-04-27T16:28:15+5:30
डीच्या डिग्गीमध्ये पाख लाख ५२ हजार २०० रुपयांची रक्कम आढळून आली
औराद शहाजानी : येथील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर निवडणूक आयोगाच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीस, महसूल, राज्य उत्पादन शुल्क, पंचायत समितीसह विविध विभागाच्या वतीने संयुक्त पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकाला तपासणी करताना शनिवारी दुपारी कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये रोख रक्कम घेऊन जात असताना गाडीच्या डिग्गीमध्ये पाख लाख ५२ हजार २०० रुपयांची रक्कम आढळून आली असून, ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
यावेळी औराद शहाजानी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे, गटविकास अधिकारी तथा आचारसंहिता प्रमुख सोपान अकेले, चेक पोस्ट पथक प्रमुख रघुनाथ तेलंग, एस.यु. खरात, वैभव ताटे, गोकुळ राठोड, पोकाॅ श्रीहरी डावरगावे, बळीराम केंद्रे, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक रमेश चाटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले आदी उपस्थित होते. सदर रक्कम ही कर्नाटकातील बसवकल्याण येथील टायर विक्रेता व्यापाऱ्यांची असल्याचे प्राथमिक निदर्शनास आलेले असून लातूर येथून ट्रकची टायर घेऊन जाण्यासाठी संबंधित दोघेजण जात असल्याचे यावेळी तपासात आढळून आले.