सौम्य लक्षणांचे ४०५ रुग्ण
जिल्ह्यात सद्य:स्थितीत रुग्ण वाढत असल्याचे दिसत असले, तरी घाबरण्याचे कारण नाही. ९५ टक्क्यांच्या पुढे सौम्य लक्षणांचे रुग्ण आहेत. ५०२ रुग्णांपैकी ४०५ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. यातील २६६ रुग्णांमध्ये तर अतिसौम्य लक्षणे असून, ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. ४०५ रुग्णांपैकी १३९ रुग्ण एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहात दाखल आहेत, तर २६६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ५३ रुग्ण मध्यम लक्षणाची आहेत. ३४ रुग्ण मध्यम, परंतु त्यांना ऑक्सिजनची गरज लागते. ९ रुग्णांना साध्या व्हेंटिलेटरची गरज असून, एक रुग्ण आयसीयूमध्ये आहे.
दरम्यान, प्रकृती ठणठणीत झाल्याने १९ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील २, होम आयसोलेशनमधील ६, उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. तेही कोरोनामुक्त झाले.