विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत ६२६ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात २२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, रॅपिड टेस्ट १४० जणांची करण्यात आली. त्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रयोगशाळेतील चाचणीत २२ आणि रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ३ असे एकूण २५ रुग्ण बुधवारी आढळले. सद्यस्थितीत ३२५ बाधित रुग्ण जिल्ह्यात आहेत. यातील १६३ रुग्ण होमअसोलेशनमध्ये तर उर्वरित १६२ रुग्ण विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एल. एस. देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८० टक्के असून रुग्ण दुप्पट दिवसाचा कालावधी ६९० दिवसावर गेला आहे. यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला असून बरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून रुग्ण संख्या घटत आहे. परिणामी पॉझिटिव्हिटी ४.५% वर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात १ हजार ५५५ रुग्ण आढळले होते. त्यात घट होऊन डिसेंबर महिन्यात १ हजार १५० रुग्ण आढळले तर चालू जानेवारी महिन्यात आतापर्यंत ३८० रुग्ण आढळले आहेत. एकंदर नोव्हेंबर महिन्यापासून रूग्ण संख्येत घट सुरू झाली आहे.