किशोरी मुलींनी जाणून घेतली ठाण्यातील कामकाजाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:42 AM2021-09-02T04:42:56+5:302021-09-02T04:42:56+5:30

कलापंढरी संस्थेचे बी.पी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पानगाव, भंडारवाडी, गोविंद नगर, बिटरगाव, सेवानगर, बिटरगाव तांडा, दामोदर ...

Adolescent girls learned about the working of the police station | किशोरी मुलींनी जाणून घेतली ठाण्यातील कामकाजाची माहिती

किशोरी मुलींनी जाणून घेतली ठाण्यातील कामकाजाची माहिती

Next

कलापंढरी संस्थेचे बी.पी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पानगाव, भंडारवाडी, गोविंद नगर, बिटरगाव, सेवानगर, बिटरगाव तांडा, दामोदर तांडा येथील किशोरी मुलींची ही अभ्यास सहल रेणापुरातील पोलीस ठाणे, शिक्षण विभागाच्या कार्यालयास निघाली होती. पोलीस ठाण्यातील कामकाजाची माहिती पोलीस निरीक्षक शेजल यांनी दिली. तसेच विविध कलम, ठाण्यात प्रक्रियेची माहीती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार गुळभिले, पीएसआय माचेवाड, पीएसआय निर्मल यांनी दिली.

शिक्षण विभागातील संपूर्ण माहिती शिक्षण विस्तार अधिकारी पुरी, साधन व्यक्ती मंजुषा अचमे, सदाफुले, खंदाडे, जाधवर, भासिंगे आदींनी दिली. या शैक्षणिक सहलीत २४ मुली सहभागी झाल्या होत्या. यशस्वीतेसाठी कलापंढरी संस्थेचे सचिव अनिरुध्द जंगापल्ले, धनराज पवार, मधुकर गालफाडे, प्रतिमा कांबळे, शालूताई साके, छायाताई मगर आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Adolescent girls learned about the working of the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.