औसा (लातूर) : केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी औसा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी केली़ जयनगर येथे त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथाही जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर कवितांची मैफलही रंगली. तेव्हा एका पोलीस कर्मचाºयाने आठवले यांच्यापुढे कविता सादर करत सर्वांची मने जिंकली.‘साहेब तुमचा कोणता का असेना पक्ष, आम्ही बंदोबस्तात आहेत दक्ष आणि तुम्ही शेतकºयांच्या प्रश्नांकडे घातले लक्ष’, अशी कविता एका पोलीस कर्मचाºयाने सादर करून सर्वांची मने जिंकली़ आठवले यांनी आपल्या कवितेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोडवे गायले़ उपस्थित ठिकाणी आपल्यासारखाच कवी तयार झाल्याचे पाहून समाधान व्यक्त केले़आठवले यांच्यासमोर व्यथा मांडणाºया शेतकºयांना त्यांचे नाव व पक्ष कोणता, असे विचारण्यात आले. माझा पक्ष भाजप असे बोलल्यानंतरच प्रकाश आलमले या ग्रामस्थाला पुढे बोलण्याची संधी दिली. सरकारच्या किसान सन्मान योजनेंतर्गत हजारो शेतकºयांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झाला नाही. परिणामी ही योजना फसवी असल्याचा आरोप शेतकºयांनी केला.
...अन् पोलिसाने ऐकविली रामदास आठवलेंना कविता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 1:19 AM