शासन योजना लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:16 AM2020-12-25T04:16:32+5:302020-12-25T04:16:32+5:30

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची लातूर येथून बदली झाल्याने त्यांचा येथील श्री संगनबसव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व लिंगायत समाजाच्या ...

Attempt to make the government plan popular | शासन योजना लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न

शासन योजना लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न

Next

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची लातूर येथून बदली झाल्याने त्यांचा येथील श्री संगनबसव बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याप्रसंगी संगनबसव विरक्त मठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश रेशमे होते. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, मठाधिपती श्री. संगनबसव महास्वामीजी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौंदळे, डॉ. मल्लिकार्जुन कुंडुबंले, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, उपाध्यक्ष शिवाजी रेशमे, नगरसेवक शंकरप्पा भुरके, डॉ. किरण बाहेती, मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील, पालिकेचे अभियंता कैलास वारद आदी उपस्थित होते.

यावेळी जी. श्रीकांत म्हणाले, शासकीय अधिकारी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नसतो. त्याची बांधिलकी राज्यघटना व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी असते. जिल्ह्यातील नागरिकांनी प्रेम, स्नेह दिला. निलंग्यात लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या शांतिवन स्मशानभूमीचे कौतुक केले.

प्रास्ताविक नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीशैल्य बिराजदार यांनी केले, तर आभार गुरुनाथ मोहळकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नागनाथ सोरडे, सचिव बुद्धिवंत मुळे, उपाध्यक्ष प्रकाश सोलापुरे, कोषाध्यक्ष बसवराज राजुरे, सहसचिव सतीश चाकोते, शिवप्रसाद मुळे, प्रशांत सोरडे, महेश पटणे, गुंडप्पा मंठाळे, संजय फुलारी, गुरुनाथ मोहोळकर, धनराज भुरके, परमेश्वर धनाश्री यांनी विशेष परिश्रम घेतले.

३३ जणांचे रक्तदान...

लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित शिबिरात ३३ जणांनी रक्तदान केले. यावेळी डॉ. कांचन भोसले, डॉ. स्नेहा देशमुख, डॉ. प्रज्ञा क्षीरसागर, गिरीश मुसांडे, नदीम सय्यद, संभाजी केंद्रे, विराज साबणे उपस्थित होते.

Web Title: Attempt to make the government plan popular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.