गावातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रबोधन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:18 AM2021-05-15T04:18:16+5:302021-05-15T04:18:16+5:30
तालुक्यातील सरपंचांशी आ. देशमुख यांनी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोना चाचणीच्या किटची कमतरता दूर व्हावी, कोरोना योद्ध्यांना सेफ्टी किट ...
तालुक्यातील सरपंचांशी आ. देशमुख यांनी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोना चाचणीच्या किटची कमतरता दूर व्हावी, कोरोना योद्ध्यांना सेफ्टी किट मिळावे, लसीचा तुटवडा दूर करावा, पोलिसांची गस्त वाढवावी, या मागण्या पालकमंत्री व आरोग्य मंत्र्यांकडे पोहोचवून मंजूर करून घेतल्या जातील. ग्रामीण भागात अनेकजण आजार अंगावर काढत आहेत. आजारी व्यक्ती घराबाहेर येत नाहीत. गृहविलगीकरणातील रुग्ण घराबाहेर फिरताना दिसत आहेत. असे प्रकार होऊ नये, यासाठी सरपंच व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. यावेळी लातूर तालुक्यातील ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांची उपस्थिती होती.
स्थानिकांनाच लस मिळावी
प्रत्येक तालुक्याला लसीचा ठराविक साठा उपलब्ध करून दिला जातो. मात्र शहरातील किंवा बाहेरील व्यक्ती ऑनलाईन बुकिंग करून लस घेण्यासाठी ग्रामीण भागात जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीपासून वंचित राहत आहेत. स्थानिकांनाच लस मिळावी, यासाठी प्राधान्य दिले पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. धीरज देशमुख यावेळी म्हणाले.