रेणापूर तालुक्यातील सारोळा येथे जागतिक मृदा दिनानिमित्त शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बाेलत हाेते. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी माधवराव चव्हाण, कृषी पर्यवेक्षक अंगद सुडे, वैभव चव्हाण, आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक रणजीत चव्हाण आणि कृषी विभागातील सर्व कृषी सहाय्यकांची उपस्थिती हाेती. यावेळी माती परीक्षणाचे महत्त्व, जमिनीतील सूक्ष्मद्रव्ये आणि त्यांचे कार्य, खतांचा संतुलित वापर, मृदा आरोग्य पत्रिका, रबी हंगामातील पिकांचे एकात्मिक किड व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबराेबर किड व्यवस्थापनात जैविक पद्धतीचा निंबोळीचा अर्क, विविध बुरशीचा वापर खूप फायदेशीर असून, आर्थिक बचतही होते. असेही शेणवे म्हणाले.
सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक वैभव चव्हाण तर आभार कृषी सहाय्यक महानंदा बगदुरे यांनी मानले. कार्यशाळेला सारोळा गावातील बसवराज गुरूफळे, जनार्दन जाधव, चंद्रकांत गुरूफळे, दगडू जाधव, सुभाष जाधव, शरद जाधव, अंगद जाधव, राजेभाऊ जाधव, प्रदीप जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.